सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण

| नाशिक | वृत्तसंस्था |

नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्च्यावेळी तणाव निर्माण झाला आहे. नाशिकच्या भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, तिथली परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचार आणि मंदिरामधील मोडतोडीच्या निषेधार्थ नाशिकमध्ये शुक्रवारी बंदची हाक देण्यात आली. सकल हिंदू समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिसांचार सुरू आहे. यादरम्यान हिंदू बांधवांवर होत असलेले हल्ले, मंदिरांची मोडतोड केली जात आहे. यादरम्यान बांगलादेशी सैन्यदलाने हिंदूंच्‍या रक्षणाचे आश्वासन दिले असले, तरी केंद्र शासनाने त्यांच्‍यावर अवलंबून न राहता हिंदू समाज व मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. यादरम्यान बांगलादेशमधील हिंसेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी (दि.16) जिल्‍हा बंदची हाक देण्यात आली होती.

Exit mobile version