| नाशिक | वृत्तसंस्था |
जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीच्या पुरात रविवारी (दि.4) अडकलेल्या 12 जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालूच आहेत. त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे. गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाठ होत आहे. याच कारणामुळे नदीच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचवण्यासाठी अनके अडचणी येत आहेत. दरम्यान, बचावकार्यासाठी आता धुळे येथून एसडीआरएफची विशेष टीम बोलावण्यात आली आहे.
अडकेलेले हे सर्वजण मासे पकडण्यासाठी गेले होते. पण अचानकपणे पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे काही समजायच्या आत ते नदीत अडकले. धुळे येथून बोलावण्यात आलेली एसडीआरएफची टीम 4 ऑगस्ट रोजीच्या रात्रीच घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र अंधारामुळे बचाव कार्य थांबविण्यात आले होते. आज सोमवारी (दि. 5) सकाळी पुन्हा एखदा अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी होताच पुन्हा बचाव कार्य सुरु केले जाणार आहे.