नागरिकांना सतर्कतेचा इशारा
| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यात खडकवासला धरणातून 35 हजार क्यूसेक्स विसर्ग केला जात होता. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पुन्हा खडकवासला धरणातून 40 ते 45 हजार क्यूसेक्स विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना तसेच सोसायटींना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. पुण्याच्या एकतानगरमध्ये पाणी शिरले आहे तर काही सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये सुद्धा पाणी शिरले आहे. बचाव पथकाकडून नागरिकांना मदत करण्यात आली आहे.