। श्रीवर्धन । वार्ताहर ।
रायगडमधील ज्या नगर परिषदांच्या मुदती संपल्या आहेत, त्या-त्या ठिकाणी शासनाने नुकतीच बॉडी बरखास्त करुन प्रशासकांची नियुक्ती केली आहे. श्रीवर्धन नगर परिषदेच्या लोकनियुक्त बॉडीची मुदत संपल्यामुळे तेथे नुकतेच काही महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी म्हणून पोलादपूरहून बदलून आलेले विराज लबडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे आता धोरणात्मक निर्णय घेणे, आर्थिक निर्णय घेणे, शहरातील विकासकामे सुरु ठेवणे आदी महत्वाचे अधिकार प्रशासक.लबडे यांना प्राप्त झाले आहेत. लबडे हे रायगड जिल्ह्यातीलच असून त्यांना पोलादपूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून व अन्य ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव आहे.