शेकापचा आक्रमकपणा
पेण | वार्ताहर |
विरार-अलिबाग बहुउद्देशी मार्गिकेसाठी भूसंपादन करणार्या मोजणी अधिकार्यांची लबाडी उघडकीस आल्याने शेकापने तातडीने सात गावातील सुरु असलेली भूसंपादनाची प्रक्रिया थांबविणे भाग पाडले. विरार – अलिबाग कॉरिडॉर विकसित करण्यासाठी पेण तालुक्यातील 7 गावांची जागा भू संपादन करण्याची सुरुवात शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. दोन आठवड्यापूर्वी प्रांताधिकारी व शेतकरी संघर्ष समितीने एकत्र बसून प्राथमिक मोजणी करण्यासाठी तयारी दर्शविली होती. मात्र गेल्या चार दिवसा पासून मोजणीसाठी येणारे अधिकारी प्रकल्प बांधित शेतकर्यांची दिशाभूल करताना दिसत आहेत. मोजणी ही प्राथमिक नसून संयुक्तीक मोजणी आहे.
परंतु शेतकर्यांना ज्या नोटिसा दिल्या आहेत त्यावर स्पष्ट नमूद आहे की मोजणी ही प्राथमिक आहे. असे असताना अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आल की अशा प्रकारच्या नोटीस आम्हाला आलेल्या नाहीत. तर संयुक्त मोजणीचे आदेशच आम्हाला दिले आहेत. शेकाप तालुका चिटणीस तथा संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय डंगर यांनी ही मोजणी तात्काळ थांबवली आणि प्रांत्त अधिकार्यांशी संपर्क साधला.परंतु प्रांत महाड पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व्यस्थ असल्याने निर्णय होऊ शकला नाही. अखेर बुधवारी माजी आमदार धैर्यशिल पाटील यांनी शेतकर्यांच्या समवेत प्रांत कार्यालयात बैठक घेऊन शेतकरी आणि अधिकारी वर्ग यांच्यामध्ये असलेला गैरसमज प्रांत विठ्ठल ईनामदार यांच्या समोर दूर केला. यावेळी भूमी अभिलेखचे अधिक्षक सुजीत जाधव हे देखील उपस्थित होते.
यावर प्रांतानीही मोजणी ही प्राथमिकच होईल संयुक्त मोजणी होणार नाही. व तसे नोटीसीवर पुन्हा एकदा नमुद केल जाईल त्याच प्रमाणे ज्या ज्या शेतकर्यांचे 32 ग च प्रकरण आहे त्यांच्यासाठी एक कॅम्प घेऊन ती प्रकरण निकालात काढण्यात येतील असे सांगितले. यावेळी प्रांत्त कार्यालयात संजय डंगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती परशुराम पाटील, आंबीवली सरपंच नेहा प्रशांत पाटील यांच्या सह शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.