सोशल मिडियातील वृत्तांनी विराट नाराज

| मुंबई | प्रतिनिधी |

सोशल मिडियावरुन आपल्याबाबत प्रसिद्ध होण्याऱ्या विविध बातम्यांबाबत क्रिकेटपटू विराट कोहलीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विराटने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक स्टोरी शेअर करताना खोट्या बातम्यांचे खंडन केले. ही स्टोरी शेअर करताना विराटने प्रसिद्ध मीडिया संस्थेवर नाराजी व्यक्त केली. खरंतर, स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही गोष्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याच्या आणि अनुष्काच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर क्रिकेट खेळपट्टी तयार केल्याची बातमी लिहिली होती.

ही स्टोरी शेअर करताना विराटने लिहिले की, मी लहानपणापासून वाचत असलेल्या वृत्तपत्रानेही फेक न्यूज छापण्यास सुरुवात केली आहे. वृत्तपत्राच्या या बातमीवर विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. नुकतेच विराट आणि अनुष्का अलिबाग येथील फार्महाऊसवर दिसले. त्यानंतर मीडियामध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात होते. विराटने फेक न्यूजवर नाराजी व्यक्त करून त्याचे खंडन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने असे केले आहे. विराटने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियाच्या कमाईबद्दलही खुलासा केला होता. अलीकडेच विराटच्या सोशल मीडियावरील कमाईबाबत एक अहवाल प्रसिद्ध झाला होता.

ज्यामध्ये त्याच्या इंस्टाग्रामवरून प्रति पोस्ट सुमारे 11 कोटी रुपये कमाई दाखवण्यात आली होती. यानंतर लगेचच विराटने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करताना याचे पूर्णपणे खंडन केले, ही बातमी खोटी असल्याचे म्हटले. मात्र, असे असूनही विराट आशियातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो होणारा व्यक्ती आहे.

Exit mobile version