विराटने घेतले विश्वचषकात सर्वाधिक झेल

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारताचा फिल्डर म्हणून विराट कोहलीने विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात चेन्नई येथे मिचेल मार्श याचा झेल घेऊन विराट कोहलीने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. विराट कोहलीने विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत. 2011 ते 2023 यादरम्यान विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक आहे. या विश्वचषकातील 27 सामन्यात विराट कोहलीने 15 झेल घेतले आहेत. अनिल कुंबळे याने 18 सामन्यात 14 झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर याला 44 सामन्यात फक्त 12 झेल घेता आलेत. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात धावांचा पाऊस पाडला आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरोधात 45 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये 53.1 च्या शानदार सरासरीने 2,228 धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधात धावांचा पाऊस पाडला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहलीने आठ शतके आणि 12 अर्धशतके ठोकली आहे. विराट कोहलीनेएकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा श्रीलंकाविरोधात ठोकल्या आहेत. श्रीलंकाविरोधात कोहलीने 50 सामन्यात 62.7 च्या सरासरीने 2506 धावा चोपल्या आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीजविरोधात कोहलीने 41 सामन्यात 66.55 च्या सरासरीने 2261 धावा चोपल्या आहेत. म्हणजेच, वनडेमध्ये सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाविरोगात तिसऱ्या क्रमांकाच्या आहेत.

Exit mobile version