चाहत्यांमुळे विराट ट्रेंडींगला…..

। सिद्धी भगत । अलिबाग ।
सध्या गुगलवर चर्चेत असलेला चेहरा म्हणजे विराट कोहली. विराट कोहलीला कोण ओळखत नाही? असा एकही भारतीय आणि क्रिकेट प्रेमी शोधून देखील सापडणार नाही ज्याने विराट कोहली हे नाव ऐकलं नसेल किंवा त्याला खेळताना पाहिलं नसेल. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघातील नामवंत खेळाडू असून सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंनंतर विराट असा खेळाडू आहे ज्याने भारतीय क्रिकेट संघाला मजबुती दिली आणि आपलं स्वतःचं स्थान भारतीच क्रिकेट कारकीर्दीत पक्क केलं आहे. आपल्या खेळातील प्रदर्शनाने आबाल-वृद्धांच्या मनात त्याने हक्काचं स्थान निर्माण केलंय. विराटला भारतीय क्रिकेट संघाचा बॅक-बोन म्हटलं जातं कारण तो उजव्या हाताने खेळणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर व सर्वाधिक प्रतिभावंत आणि हुशार खेळाडूंपैकी एक आहे. आज विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून शेकडो तरुणांचा स्टाईल आयकॉन देखील झाला आहे व आपल्या खेळाच्या शौलीमुळी ते नेहमीच ट्रेंडीग राहीला आहे.
भारतीय क्रिकेट संघातील या खेळाडूचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्ली येथील एका पंजाबी कुटुंबात झाला. वडील प्रेम कोहली हे एक क्रिमिनल लॉयर होते तर आई सरोज कोहली या गृहिणी होत्या. विराटला एक मोठा भाऊ विकास आणि मोठी बहिण भावना देखील आहेत. विराट जेंव्हा अवघ्या तीन वर्षांचा होता अगदी तेंव्हापासून त्याच्या आवडत्या खेळांमध्ये क्रिकेट फार आवडीचा खेळ होता. तो जसा-जसा मोठा होत गेला, क्रिकेटची त्याची आवड वाढत गेली. त्याच्या वडीलांनी त्याचा क्रिकेटकडचा कल ओळखला होता, ते त्याला रोज क्रिकेट प्रशिक्षणासाठी घेऊन जात असत.
विराट चे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील विशाल भारती पब्लिक स्कूल येथून झाले. शिक्षणात विराट सर्वसामान्य होता आणि त्याचे संपूर्ण लक्ष कायम क्रिकेटकडेच होतं. त्यामुळे त्याच्या वडिलांनी देखील त्याची आवड पहाता अवघ्या 9 व्या वर्षी त्याला क्रिकेट क्लबमधे पाठविण्यास सुरुवात केली. जेणेकरून क्रिकेट मधील बारकावे त्याला शिकता यावेत. अगदी सुरुवातीपासून सगळं लक्ष क्रिकेटवर असल्याने विराटने 12वी पर्यंत शिक्षण घेऊन त्यानंतर आपलं पूर्ण लक्ष क्रिकेट वर केंद्रित केलं. दिल्लीत विराटचे कोच राज कुमार शर्मा हे होते, व सुमित डोंगरा नामक अकेडमीतून पहिला सामना खेळला.


2011 साली विराट कोहलीने कसोटी क्रिकेट विश्‍वात आपलं स्थान निर्माण केलं होतं. नंतर त्याने एकदिवसीय सामन्यात 6 व्या स्थानावर फलंदाजीस सुरुवात केली. त्या दरम्यान त्याला दोनदा पराजयाचा देखील सामना करावा लागला परंतु आपल्या पराजयाने तो कधीही खचला नाही किंवा निराश देखील झाला नाही. उलट तो पराजयातून शिकत गेला आणि आपल्या खेळात तो अधिकाधिक उत्कृष्ट बनत गेला. आणि त्यानंतरच्या सामन्यात त्याने 116 धावा केल्या. या सामन्यात भारताला विजय मिळाला नाही पण विराट एकमेव शतक बनविणारा भारतीय खेळाडू ठरला. पुढे विराट कोहली ने कॉमनवेल्थ बैंक ट्राएंगुलर सिरीज मधे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंके विरूद्धचे सामने जिंकत 7 पैकी 2 सामन्यांमध्ये यश मिळवले. तसेचया सिरीज मधे फायनलला जाण्यासाठी श्रीलंके विरुद्ध 321 धावांचे लक्ष्य होते. यात विराट ने 133 धावा काढत भारताला विजय मिळवून दिला आणि मैन ऑफ द मैच हा खिताब पटकावला. त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याला सलग खेळण्याच्या संधी मिळत होत्या, त्यानंतर त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकले व त्यात तो यश्यस्वी झाला.
कर्णधार म्हणून विराट कोहलीने आपली जवाबदारी फार चांगल्या तर्‍हेने निभावली आणि आपल्या संघाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर विराट 500 धावांचा रेकॉर्ड तोडण्यात यशस्वी झाला. विराट 20 ओडीआय मध्ये शतक झळकवणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. त्याच्या पूर्वी सचिन तेंडुलकरने हा विक्रम केला आहे. क्रिकेट मधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्र सिंह धोनी नंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 3 वर्षात सलग 1 हजाराहून अधिक धावा काढणारा चौथा क्रिकेटर ठरला आहे. विराट कोहली हा खेळाडू 1000, 3000, 4000, आणि 5000 धावांचा रेकॉर्ड बनविणारा सर्वात वेगवान भारतीय खेळाडू आहे. शिवाय रिचर्ड समवेत रेकॉर्ड ची तुलना करता विराट 5000 धावा काढणारा सर्वाधिक वेगवान आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी एक ठरला आहे.

Exit mobile version