विरु, अनुष्काच्या बॉडीगार्डला दरमहा 10 लाख पगार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रकाश सिंग उर्फ सोनू नावाच्या बॉडीगार्ड ची नियुक्ती केली आहे, अनुष्का शर्मा सोनूला दरवर्षी 1.2 कोटी रुपये म्हणजेच 10 लाख रुपये प्रति महिना देते.
सोनू अनुष्का शर्मासोबत अनेक वर्षांपासून आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 2017 मध्ये विवाहबद्ध झाले. त्यानंतर सोनूने विराट कोहलीलाही सुरक्षा देण्यास सुरुवात केली. विराटकडे स्वत:च्या सुरक्षेसाठी वेगवेगळे लोक आहेत. विराट आणि अनुष्कासाठी सोनू घरातील सदस्याप्रमाणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी तयारी करत असून, तिथे तो तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. त्यानंतर भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, ज्यामध्ये विराट कोहली खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच बीसीसीआयने रोहित शर्माला वनडेचा नवा कर्णधार बनवले आहे.

Exit mobile version