। सांगली । प्रतिनिधी ।
सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निडणूक लढवत असलेले काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील काँग्रेसची विचारधारा आणि लोकसभा मतदारसंघातील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवत असल्याचे म्हणत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर सनसनीत आरोप करत ते भाजपची बी टीम असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सांगलीतील तिरंगी लढतीत भाजपच्या संजय काका पाटील यांचे चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांना आव्हान असणार आहे. अशात हे सर्वच उमेदवार एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याने सांगलीची निवडणूक रंगतदार वळणावर पोहचली आहे. काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याबाबत बोलताना चंद्रहार पाटील पुढे म्हणाले, 2014 मध्ये त्यांचे भाऊ केंद्रीय मंत्री होते तरीही ते पराभूत झाले. 2019 मध्येही काँग्रेसकडे ही जागा नव्हती. 2014 ते 2024 पर्यंत काँग्रेसचे सांगलीत कुठेही काम नाही मग ते या जागेवर कसा दावा करू शकतात.