| पनवेल | वार्ताहर |
पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी विश्वास म्हात्रे यांचे त्यांच्या राहत्या घरी गुरुवारी (दि.14) निधन झाले. गेली अनेक वर्ष त्यानी विस्तार अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी उरण, कोप्रोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या निधनानंतर शुक्रवारी सकाळी पनवेल पंचायत समितीमध्ये त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आणि कर्मचार्यांनी तसेच पनवेल पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचार्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पनवेलमधील काही नागरिक देखील या शोकसभेला उपस्थित राहिले होते.







