। माणगाव । वार्ताहर ।
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर व उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांच्यासोबत जिल्ह्यातील 15 तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी स्वदेस फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आलेल्या माणगाव तालुक्यातील निवी व तळा तालुक्यातील वावे हवेली या स्वप्नातील गावांना नुकतीच भेट दिली.
गाव विकास समिती निवी व वावे हवेली यांनी स्वप्नातील गावची संकल्पना, केलेले नियोजन, गाव विकास आराखडा, त्यानुसार नियोजित वेळेत पूर्ण केलेली कामे यांचे उत्तम पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. तसेच शेती आणि शेती पूरक व्यवसायातून केलेली प्रगती व पुढे करावयाची कामे आणि जबाबदारी पाहून सर्व अधिकारी वर्गाने गाव विकास समिती चे कौतुक केले.
यावेळी तुषार इनामदार, प्रसाद पाटील, नजीर शिकलगार,विकास खरमाळे, एन.वाय.घरत, सागर वाडकर, मधूकर शेंडे, योगेश कोळी, प्रमोद शिंदे, शिवतेज ढऊल, भीमराव भालेराव, रवींद्र राऊत, प्रदीप चिनके, मिलिंद आढाव, निनाद दर्गे, राकेश पाखुर्डे, लहू दोलताडे, चांगदेव सानप, शर्मिला बडेकर, माधुरी पारावे, मानसी बाबरे व गाव विकास समिती निवी व वावे हवेली, शेतकरी बांधव, ग्रामस्थ महिला व पुरुष उपस्थित होते.