पुण्याच्या महिलांना पद्मदुर्ग किल्ल्याचे दर्शन

मुरुड | वार्ताहर |
मागील 30 वर्षांपासून दुर्ग संवर्धन व दुर्ग सहली घडविण्यात कार्यरत असलेल्या पुण्यातील कर्वेनगर येथील श्री दुर्गराज प्रतिष्ठान ने 200 महिलांना मुरुड जंजिरा येथील पद्मदुर्ग व अष्टविनायकातील पालीच्या गणपतीचे दर्शन घडविले .
पुढच्या पिढीला संस्कार घडविण्याचे कार्य करणार्‍या महिलांना त्यांच्या रोजच्या कामकाजाच्या चाकोरीतुन बाहेर काढून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे प्रत्यक्षात दर्शन घडावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती व्हावी तसेच संगणकीय युगात विद्यार्थ्यांना ऐतिहासिक गडकिल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी आम्ही या सहलींचे आयोजन करीत असल्याचे प्रतिष्ठान चे सदस्य ललित गव्हाणे यांनी सांगितले, या सहलीचे आयोजन प्रतिष्ठानचे सदस्य ललित गव्हाणे , रुपेश सकपाळ , चेतन धाडवे , निखिल बलकवडे यांनी उत्कृष्ट प्रकारे केल्यामुळे व पद्मदुर्ग किल्ल्याचे व पालीच्या गणपतीचे दर्शन घडविल्याबद्दल व माहिती दिल्याबद्दल सहलीमध्ये सहभागी झालेल्या पुणे कर्वेनगर येथील नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे यांनी प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले

Exit mobile version