शेकडो शिवप्रेमींकडून शिवरायांचा जयघोष
| आगरदांडा । प्रतिनिधी ।
पद्मदुर्ग जागर समिती मुरुड व कोकण कडा मित्र मंडळ रायगड सर्व संलग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मदुर्ग जागर या कार्यक्रमात शेकडो शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता. महाड, नवी मुंबई, मुरुड, पनवेल,आदी भागातील असंख्य शिवप्रेमी व पर्यटक यांनी सकाळपासूनच समुद्र किनारी होडीमधून जाण्यासाठी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास जागृत ठेवण्यासाठी व पदमदुर्ग किल्ला संवर्धन करण्यासाठी दरवर्षी शिवप्रेमींकडून पदमदुर्ग जागर हा कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, जय शंभुराजे, राजमाता जिजाऊ या घोषणांनी पद्मदुर्ग किल्ला परिसर दणाणून गेला होता. सकाळपासूनच पदमदुर्ग किल्ला फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. सदरील गडाची स्वछता व पालापाचोळा याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली होती.
शिवपालखी वाजतगाजत समुद्र किनारापासून बोटीनी गडावर आणण्यात आली. ढोल ताश्याच्या गजरात शिवपालखी गडावर नेण्यात आली. शिवकाळी पेहराव असणारे मावळे गडावर ढाल व भाला घेऊन जगता पहारा देऊ लागले होते. राजपुरोहीत प्रकाश स्वामी जंगम यांच्या हस्ते शिवप्रतिमेची विधीवत पूजा करण्यात .मंत्राच्या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.सारे वातावरण शिवकालीन झाले होते.
मुरुड पद्मदुर्ग जागर समिती सचिव -राहुल कासार व त्यांच्या पत्नी शुभांगी कासार यांच्या शुभ हस्ते गडपुजन करून शिवप्रतिमेला जलाभिषेख करण्यात आला . इतिहास अभ्यासक नितीन पावले व गजानन सरपाटील यांनी शिवरायांची राजनीती व सर्वधर्म समभाव जोपासून सर्व जातीचे मावळे घेऊन स्वराज्य घडवले याबाबतचे सविस्तर माहिती त्यांच्या व्याखनात सांगितली.
पद्मदुर्ग किल्ला संदर्भात महेश मोरे, ज्ञानेश्वर काकडे अनिकेत कदम यांनी या बाबत मार्गदर्शन केले.तसेच शिवरायांचे मावळे बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड स्वराज्यासाठी कशी लढवली याचे रोमहर्षक वर्णन करून शिवप्रेमीना एक नवा जोश दिला. शिव मर्दानी आखाडा साळाव येथुन आलेले शिव मावळ्यांनी विविध शौर्याचे खेळ दानपट्टा ,तलवारबाजी मलखांब ,पारंपरिक गोंधळ सादर करण्यात आला.
या जागरमध्ये सुरेश पवार, आशिल ठाकुर, विजय वाणी, रुपेश जामकर,मदन हणमंते, योगेश सुर्वे, महेंद्र मोहिते, महेश साळुंखे, संकेत आरकशी, राहुल कासार, सुनील शेळके, अच्युत चव्हाण, गणेश सतविडकर,बाळा साखरकर, अनिकेत पाटील, संदीप घरत,योगेश चोगले, प्रवीण पाटील,आकाश मुळेकर,अलिबाग ग्रुप, खारंबोली ग्रुप, आदिंसह शकोडो शिवप्रेमी उपस्थित होते.
.किल्लाचा बहुतेक भाग समुद्राच्या लाटेने ढासळत चालला आहे.राज्यात नविन महाराजाचे पुतळे उभे केले पाहिजेत पण त्याबरोबर राजे शिवछत्रपती यांनी बांधलेले किल्लाचे ही संवर्धन होणे जरुरी आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्याकरिता विधानसभा व लोकसभेत आवाज उठवा असे आवाहन आशील ठाकुर यांनी केले. तसेच पदमदुर्ग किल्ल्यावर जेट्टी बांधणे खूप आवश्यक आहे.येथे जेट्टी नसल्याने पर्यटकांना येथे जाता येत नाही जेट्टी झाल्यास स्थानिकांना रोजगार व पर्यटकांची संख्या वृद्धिगत होण्यास मदत होणार आहे. . असे मत आशिल ठाकुर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मत व्यक्त केले आहे.किल्ल्यावर जाण्यासाठी बोटींची चोख व्यवस्था व्यवस्थापनाकडून करण्यात आली होती.पदमदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी समुद्र किनारी सकाळपासून मोठी गर्दी पहाण्यास मिळत होती.
कोट
गेले 14 वर्ष पद्मदुर्ग जागर समिती व कोकण कडा मित्र मंडळ रायगड सर्व संलग्न संस्था मार्फत जागर कार्यक्रम राबवितो. हा कार्यक्रम राबविण्याचा मुख्य कारण म्हणजे शासनाने या किल्ल्याकडे लक्ष वेधून किल्ल्याचे संवर्धन करावे हाच मुख्य उद्देश आहे परंतु शासनाने या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता तरी शासनानी राजे शिवछत्रपती यांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्लाकडे त्वरीत लक्ष द्यावे नाहीतर हा किल्ला इतिहास जमा होईल
-आशिल ठाकुर, अध्यक्ष,