रायगड जिल्हा ग्रंथालय संघाची माथेरान ग्रंथालयास भेट

| नेरळ | वार्ताहर |
ब्रिटिशकालीन असलेल्या माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या ग्रंथालय 125 वर्षात पदार्पण करीत असून, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाची माथेरान ग्रंथालयास भेट देऊन हेरिटेज वास्तू आणि अनमोल पुस्तकांचा ठेवा पाहून संघाने नगरपालिकेचे कौतुक केले.
1897 साली माथेरान नगरपालिका होण्याअगोदर या ग्रंथालयाची निर्मिती ब्रिटिशांनी केली. माथेरान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर असलेल्या या ग्रंथालयात 12 हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचा ठेवा असून, वाचक वर्गही मोठ्या प्रमाणावर होता. कोविड काळात लॉकडाऊनमुळे वाचक संख्या घटली होती. पण, याच कोविड काळात या वास्तूचे रुपडे बदलण्यात पालिकेला यश आले. यावर्षी हे ग्रंथालय 125 वर्षात पदार्पण करीत असल्याने रायगड जिल्हा ग्रंथालय संघाने या ग्रंथालयास भेट दिली. रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, कार्यवाहक संजय भायदे, खजिनदार राजेश खेडेकर, रामदास गायकवाड यांनी माथेरानच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांची ग्रंथालयात भेट घेतली. यावेळी या ग्रंथालयात काय बदल अपेक्षित आहेत यावर चर्चा झाली.
ग्रंथालयाचे 125 वर्षात पदार्पण होत असल्याने 23 मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन नगरपालिकेमार्फत केले जाणार असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांनी सांगितले.तसेच या ग्रंथालय डिजिटल कसे होईल याकडे पुरेपूर लक्ष दिले जाणार आहे.स्थानिकासह पर्यटकही या ग्रंथालयाकडे कसे आकर्षित होतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे ही मुख्याधिकार्यांनी स्पष्ट केले. यावेळी क्लार्क रत्नदीप प्रधान, प्रवीण सुर्वे, लेखापाल अंकुश इचके, अन्सार महापुळे, संदेश कदम उपस्थित होत

Exit mobile version