। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन नुकतेच उरण येथे पार पडले. या अधिवेशनात रायगड जिल्हा ग्रंथालय संघातर्फे जिल्हातील ग्रंथालय चळवळीतील तरुण कार्यकर्ते आणि रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह स्व.संजय पांडुरंग भायदे यांचे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार यावेळी सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबाग या संस्थेस प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचा स्विकार सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैलाताई पाटील यांनी केला. यावेळी सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाचे जेष्ठ संचालक श्री नागेश कुळकर्णी, ग्रंथपाल भालचंद्र वर्तक उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबागचे अध्यक्ष अँड.गौतम पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पाटील, कार्याध्यक्ष रामदास गायकवाड, खजिनदार संजय खांबेटे यांनी अभिनंदन केले आहे.