शाळा ग्रंथपालांकडून वेतन अधीक्षकांची भेट

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
रायगड जिल्हा माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाकडून वेतन अधीक्षक रुपाली सावंत यांची भेट त्यांच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष आशिष पारसनीस, सचिव नितीन ठाकूर, सह सचिव नरेंद्र पाटील, खजिनदार विशाल जगे यांनी भेट घेतली. ग्रंथपाल संघाच्या या नवीन कार्यकरणीने वेतन अधीक्षक रुपाली सावंत यांना पुस्तक भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्रंथपाल शिष्टमंडळाकडून वेतन अधीक्षक यांना रीतसर निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी सहावा वेतन आयोगातील अर्धवेळ ग्रंथपालांचा सातव्या वेतन प्रमाणे निघणारा फरक या संदर्भात चर्चा केली. सातव्या वेतन आयोगामधील पाच हप्त्यात दिला जाणारा फरक यापैकी पहिला हप्ता हा लवकरात लवकर मिळावा अशी यावेळी मागणी करण्यात आली.

Exit mobile version