व्हाट्सअँप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शाळांना भेट

| माणगाव | वार्ताहर |

शासनाच्या नवीन धोरणानुसार दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमाअंतर्गत माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा कशेणेमध्ये व्हाट्सअँप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शाळांना भेट हा कार्यक्रम शनिवार दि. 22 जून 2024 रोजी राबविण्यात आला.

दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत कशेणे शाळेने तालुक्यातील विघवली केंद्रातील निसर्गाच्या सानिध्य्यात वसलेल्या व ऑक्सिजन पार्क असणार्‍या राजिप शाळा कुशेडेला कशेणे शाळेतील विध्यार्थ्यांनी ऑनलाईन भेट दिली. यावेळी कुशेडे कशेणे शाळेतील विध्यार्थ्यांनी सुंदर पेंटिंग व बागबगीचा पाहिला. तसेच कुशेडे शाळेतील मुलांसोबत छानसा सुसंवाद साधला. तेथील शिक्षक रजपुत मॅडम व म्हस्के सर यांना कशेणे शाळेतील विध्यार्थ्यांनी काही प्रश्‍न विचारले. कुशेडे शाळेतील मुलांनी बागेतील इतर सर्व झाडे दाखविली तर पहिलीतील मुलाने वाचन करून दाखविले. कशेणे शाळेतील मुलांनी कुशेडे शाळेतील शिक्षकांचे आभार मानले. अशा प्रकारे केंद्रातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण शाळांना आम्ही वर्षभरात भेट देणार असल्याचे कशेणे शाळेच्या शिक्षिका अपूर्वा जंगम यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले .

Exit mobile version