आश्रमशाळेला दिली भेट

| पाली/गोमाशी । वार्ताहर ।
शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक) अंतर्गत बीएड द्वितीय वर्ष 2022-23 च्या छात्र अध्यापकांनी शैक्षणिक सहली निमित्त सुधागड येथील चिवे आदिवासी आश्रमशाळेला रविवार (18) रोजी दिली भेट.

या द्वितीय वर्ष बीएडच्या अध्यापकाने चिवे आश्रम शाळेतील मुख्याध्यापक पिंगळे, गुरव शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप अध्यापक वर्गाकडून करण्यात आले. त्यानंतर पाली येथील बल्लाळेश्‍वराचे दर्शन घेऊन उन्हेरे कुंडाकडे प्रस्थान करून विसावा फार्म हाऊस येथे सर्व अध्यापकाने मजा मस्ती करून शैक्षणिक सहलीची सांगता करण्यात आली. यावेळी केंद्र समन्वयक डॉ नीलिमा मोरे, डॉ छाया शिरसाट ,डॉ हर्षाली पात्रे, डा.ॅ जयप्रभा आसोरे, डॉ संजय पाटील, डॉ. समीक्षा म्हात्रे तसेच बीएड द्वितीय वर्षातील सर्व अध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version