। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील विठोबा रामभाऊ गुंड यांचे बुधवारी (दि.19) निधन झाले आहे. निधनासमयी ते 82 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
विठोबा गुंड हे रायगड जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, आंदोशी, भोनंग, कोर्लई अशा अनेक शाळेमध्ये सेवा केली आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. एक आदर्शवत शिक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काम केले आहे. प्रदिर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले. आपल्या शिक्षणाचा फायदा समाजाच्या हितासाठी व्हावा, यासाठी त्यांनी सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेतला होता. वेगवेगळे सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
विठोबा गुंड यांचा दशक्रिया विधी रविवारी (दि.23) रोजी त्यांच्या राहत्या घरी बेलोशी येथे होणार असल्याची माहिती गुंड कुटूंबियाकडून देण्यात आली आहे.