। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रामचंद्र मणिराम सिंगासने श्रीगांव यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ गतवर्षी श्री क्षेत्र रामेश्वर चौल येथे विठ्ठल रखुमाईच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा केली. त्याचा वर्धापनदिन बुधवारी (दि.20) विविध धार्मिक कार्यक्रमांत संपन्न झाला. याप्रसंगी काकड आरती, गणपतीपूजन, होमहवन, अभिषेक, प्रवचन, हरिपाठ, किर्तन इ. कार्यक्रमाची मांदियाळी होती.
यावेळी प्रफुल्ल पुनकर यांचे प्रववचन, विद्याधर निळकर व साथकरी मंडळ देहेन यांचे हरिपाठ, तसेच रमाकांत शास्त्री व पांडुरंग शितोळे यांची सुश्राव्य अशी किर्तने झाली. किर्तनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी चौल परिसरातील अनेक विठ्ठल भक्त व शिवभक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेश्वर भक्त मंडळ व विठ्ठल भक्तांचे विशेष सहकार्य लाभले.
विठ्ठल रखुमाई वर्धापन दिन
