आधी मतदान, मगच लगीन

नवरदेव थेट मतदान केंद्रावर, आधी बजावला मतदानाचा हक्क

। हिंगोली । वृत्तसंस्था ।

सेनगाव तालुक्यातील उटी (ब्रम्हचारी) येथे नवरदेवाने बोहल्यावर चढण्याअगोदर मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी लग्नाचा मुहूर्त असल्यामुळे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होणार नाही, याची काळजी प्रत्येक मतदाराने घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले होते. देतसेनगावातील गोपाल पोहकर यांचा विवाह हिंगोली तालुक्यातील आमला येथील मुलीशी (दि.26) एप्रिल रोजी ठरला. विवाह आणि मतदानाचा मुहूर्त एकाच दिवशी आल्याने नवरदेव गोपाल पोहकर यांनी लग्नाकरीता आमला येथे निघण्याअगोदर उटी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नवरदेव मतदानासाठी आल्याचे पाहून मतदान केंद्रांवरील अधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी स्वागत केले.

Exit mobile version