तुंगीमध्ये मतदारांचा उत्साह

हजार फुटांचा डोंगर चढून मतदान

| नेरळ | वार्ताहर |

मावळ लोकसभा मतदासंघासाठी सोमवारी (दि.13) निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत 33 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर, यासाठी कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या समुद्रसपाटीपासून 1 हजार फूट उंच अशा तुंगी गावात देखील नागरिकांनी मतदान केले. महत्त्वाची बाब म्हणजे एवढा डोंगर चढून नागरिकांनी मतदान केले.

कर्जत तालुक्यात डोंगर दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. तर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगेत समुद्रसपाटीपासून एक हजार फूट उंचावर तुंगी हे गाव वसलेले आहे. या गावात 355 मतदार आहेत. मात्र, गाव उंचीवर असल्याने गावाला अनेक वर्ष रस्ता नव्हता. आता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी पोटापाण्यासाठी येथील बहुतांश नागरिक हे नेरळ, कशेळे कर्जत अशा भागात वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांचे मतदान हे तुंगी गावातच आहे. त्यामुळे मतदानासाठी अनेक नागरिक हे डोंगर चढून गावात दाखल झाले व त्यांनी उत्साहाने मतदान केले असल्याचे चित्र होते.

Exit mobile version