| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्यामार्फत दि.9 नोव्हें. ते 8 डिसें. या कालावधीत मतदार नोंदणी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड-जंजिरा येथे निवडणूक शाखा मुरुड तहसिलदार यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष शिबिरामध्ये नायब तहसिलदार अमित पुरी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीविषयी माहिती सांगून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले. या शिबिरामध्ये जवळ जवळ 50 युवकांची मतदार नोंदणीचे अर्ज जमा करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्रा. डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन पवार, स्वयंसेवक रितिका माळी, युसूफ कादिरी, पूर्वजा धुमाळ, आफान रामराजकर यांनी परिश्रम घेतले.





