टिएमसी कॉलेजमध्ये मतदार नोंदणी

| माणगाव | वार्ताहर |

जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे, टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज माणगाव येथे गुरुवार दि.30 नोव्हेंबर रोजी युवा मतदार नोंदणी शिबिर संपन्न झाले. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण होत आहे अशा विद्यार्थ्यांना यावेळी नव मतदार नोंदणी फॉर्मचे वाटप करुन त्याकडून नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी नानासाहेब सावंत यांनी भूषविले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पुराणिक, अर्जुन जमखंडी मंडळ अधिकारी माणगाव, प्रियंका सतेरे तलाठी माणगाव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील प्रा.ए पी. मोरे, ग्रंथपाल अमित बाकडे, सौ. मांडवकर, सौ. सायगावकर आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांचे उत्तम सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत माळी यांनी केले. तर, आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.हर्षल जोशी यांनी केले.

Exit mobile version