आधार लिंकला मतदारांचा प्रतिसाद

। चौल । प्रतिनिधी ।

मतदार ओळखपत्र आधारकार्डशी संलग्न करण्याचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यातही 1 ऑगस्टपासून या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. या पावर्श्भूमीवर मतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड जोडणीसाठी विशेष मोहीम सोमवारी (दि.12) चौल ग्रामपंचायतीचे सदस्य शशिकांत म्हात्रे यांच्या पुढाकारातून चौलमळा येथे राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चौलमळा येथील कृष्णादेवीच्या मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शशिकांत म्हात्रे यांच्यासह प्रशांत आमरे, अनंत नाईक, अल्पेश घरत, उदय मोरे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांचे फॉर्म भरुन घेण्याचे काम शुभांगी घरत यांनी केले.

सर्वसामान्य ग्रामस्थांना ऑनलाईनविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे सरकारी कार्यालयात जाऊन त्यांचा गोंधळ उडतो. शिवाय, वेळ व पैसाही खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन शशिकांत म्हात्रे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्रामस्थांची अडचण दूर केली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने गावचे प्रमुख रवींद्र घरत यांनी म्हात्रे यांचे आभार मानले. यावेळी दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी एकाच वेळी मतदार ओळखपत्र आधारकार्डला लिंक करुन घेतले.

Exit mobile version