साबळे विद्यालयात मतदान जनजागृती अभियान

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य असणार्‍या अशोकदादा साबळे विद्यलयातर्फे मतदान जनजागृती अभियान कार्यक्रम दि. 21 ते दि. 26 ऑक्टोबरदरम्यान उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत साबळे विद्यालयातर्फे रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, विद्यार्थी रॅली तसेच बाईक रॅली काढण्यात आली. क्रीडा शिक्षक वाढवळ व डॉ. रावळे यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी समस्त माणगावकरांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या मतदान जनजागृतीच्या विविध कार्यक्रमात मुख्याध्यापक डी.एम. जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप उभारे, उपप्राचार्य जमधाडे, पर्यरक्षक सोनावणे, शिक्षक प्रतिनिधी पाटील तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

Exit mobile version