। माणगाव । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यदिनी घरोघरी तिरंगा मोहीम राबविण्यात येणार असून याबाबत जनजागृती म्हणून माणगाव नगरपंचायतीकडून भव्य रॅलीचे आयोजन शनिवार दि.6 ऑगस्ट रोजी करण्यात आले. विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी नगरपंचायत कार्यालय याठिकाणी जमा झाले होते. त्यानंतर रॅली शेलार नाका ते बालाजी कॉम्प्लेक्स अशी काढण्यात आली. या रॅलीत नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, सचिन बोंबले, रत्नाकर उभारे, प्रशांत साबळे, राजेश मेहता, अजित तारळेकर, शर्मिला सुर्वे, ममता थोरे, रिया उभारे, सुविधा खैरे, नंदिनी बामगुडे, रश्मी मुंढे, लक्ष्मी हिलम, हर्षदा काळे, मुख्याधिकारी राहुल इंगळे, नितीन दसवते, सिद्धांत देसाई, नगरपंचायतीचे कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.