। खरोशी । प्रतिनिधी ।
लोकसभा मतदान 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा सावरोली यांच्यावतीने मतदान जनजागृती कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात सायकल रॅली काढून प्रभात फेरीने करण्यात आली. शाळेतील सर्व मुलं व मुली त्याचप्रमाणे मुख्याध्यापक बळीराम चव्हाण, सहशिक्षक जगदीश मोहने, नारायण गाडे, धनाजी थिटे, दादासाहेब मुंजाळ, जानवी सुर्वे, अंकिता चोगले व ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रभात फेरीमध्ये मुलांनी जनजागृती करताना ‘माझे मत माझा अधिकार’ त्याचप्रमाणे ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या.