| तळा | प्रतिनिधी |
तळा तहसील कार्यालय तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या स्वीप पथकाअंतर्गत तळा बाजार पेठेतील बळीचा नाका ते बस स्थानक या दरम्यान तळा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार स्वाती पाटील, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, भारत जाधव तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी, उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, तळा यशथील स्वीप पथकाच्या नोडल अधिकारी दिपाली शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांमार्फत तळा बाजारपेठ परिसरात मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण देशभरात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांना अधिक महत्त्व आहे. हे अंगणवाडी सेविकांनी सर्व मतदारांना समजावून सांगितले.