| आंबेत | वार्ताहर |
देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर होताच लोकसभा उमेदवारसह प्रशासन देखील खडबडून जाग झाले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रम नुसार कोकणातील 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी निवडणुकीची घोषणा ही तिसर्या टप्प्यात होणार असून यंदा या निवडणुकीत मतदान टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम हाती घेतलाय यामध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत आज 192 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील म्हसळा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किसन जावळे आणि प्रांताधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली यावेळी तहसीलदार समीर घारे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड मंडळ अधिकारी सलीम शहा यांसह अन्य अधिकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.