| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील गोडसई येथील रहिवासी हाफीजाबानो रहीम पठाण यांचे नुकतेच वयाच्या 90 व्या वर्षी वयोवृध्दत्वामुळे निधन झाले. दिवंगत हाफीजाबानो पठाण यांच्या पार्थिवावर कोलाड येथील सय्यद व पठाण कुटुंबियांच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. यांच्या पश्चात चार मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.