पनवेल अर्बनसाठी चुरशीने मतदान

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल अर्बन बँकेची निवडणूक रविवारी (दि.27 ) पार पाडली. या निवडणुकीत महाविकास आघाडी मधून मविआचे सहकार पॅनल उभे आहे. केले असून या मध्ये शेकाप सात, ठाकरे गट दोन, काँग्रेस तीन आणि राष्ट्रवादी काँ. एक असे एकूण 13 उमेदवार रिंगणात आहे. तर भाजपने उत्कर्ष पॅनल मधून 13 उमेदवार उभे केले आहेत. या मतदानाच्या वेळेस सकाळपासूनच महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत होते. यामध्ये सकाळपासून आ. बाळाराम पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, सुदाम पाटील, काशिनाथ पाटील, राघो पाटील सकाळपासूनच या मतदान केंद्राच्या बाहेर तळ ठोकून बसले होते.

Exit mobile version