सात ग्रामपंचायतींसाठी मतदान

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी उद्या 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या सात ग्रामपंचायतींमधील 69 जागांसाठी आणि थेट सरपंचपदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. दरम्यान, चार ग्रामपंचायतींमधील 15 सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याने 54 सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तर थेट सरपंच पदाच्या सात जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत.

तालुक्यातील कोंदिवडे, मांडवणे, उकरूळ, वेणगाव, वावळोली, दहिवली तर्फे वरेडी या सात ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदांसाठी मोठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. सात ग्रामपंचायतींमध्ये नामांकन अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत उकरूल ग्रामपंचायतीमधील तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

तर, वेणगाव ग्रामपंचायतीमध्ये एक सदस्य बिनविरोध निवडला गेला आहे. दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीमध्ये चार सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर वावलोळी ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी सात सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे सात ग्रामपंचायतींमधील एकूण 69 जागांपैकी 15 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे आता सदस्यपदासाठी 54 जागांकरिता उद्या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान होणार आहे.

Exit mobile version