। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील दहा नगरपरिषद निवडणुकांसाठी आज मंगळवारी (दि.2) मतदान होत आहे. सर्व मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 281 मतदान केंद्रावर मतदान होणार असून सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत.







