साळाव जेएसडब्लू फांउडेशनच्या स्तुत्य उपक्रम
| रेवदंडा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील साळाव जेएसडब्लू कंपनीच्या जेएसडब्लू फांउडेशन मार्फत मिठेखार ग्रामपंचायत हद्दीत वाघूलवाडी व आमली गावासाठी जलशुध्दीकरण प्रकल्पाचे नुकतेच शुभारंभ झाला. कंपनीच्या सिएसआरच्या माध्यमातून मिठेखार ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा चवरकर यांच्या मागणीने वाघूलवाडी व आमली गावाना जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या जलशुध्दीकरण प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून कंपनीचे प्लांन्ट हेड पंकज मलिक, सिएसआर विभागाचे प्रोग्राम लीड राम मोहिते, राकेश चवरकर, सरपंच चवरकर, उपसरपंच जीवन सुतार, निलेश चवरकर, जौन्सा सुतार, सोनाली आर्डे, वाघुलवाडी गाव अध्यक्ष जगदीश खोत, नितिन आर्डे तसेच वाघुलवाडी व आमली येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरूवातीस कंपनी प्लांट हेड मलिक, मोहिते, यांचे हस्ते फित कापून जलशुध्दीकरण प्रकल्पाचे शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित कंपनी अधिकारीवर्गाचे स्वागत चवरकर यांनी केले.