शालेय विद्यार्थ्यांची दमछाक
| नेरळ । वार्ताहर ।
माथेरानमधील पायलट प्रकल्प संपल्यानंतर पर्यावरण पूरक ई-रिक्षा आता पालिकेच्या आवारात उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे माथेरानमधील स्थानिकांनी पुन्हा ई-रिक्षा सुरू झाल्याचं पाहिजेत अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, ई-रिक्षा सुरू करण्यासाठी मान्यता देणार्या सनियंत्रण समितीची बैठक 20 मार्च रोजी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर ई-रिक्षा संबंधी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे या बैठकी बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पाच डिसेंबर 2022 ते चार मार्च 2023 या कालावधीत पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालविण्याचा पायलट प्रकल्प राबविला होता. या कालावधीत ई-रिक्षा चालविण्यास स्थानिक पातळीवर अश्वपालक यांनी विरोध केला होता. मात्र तरी देखील शालेय विद्यार्थी यांना सेवा दिल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांना तीन महिने ई-रिक्षा मधून सेवा देण्यात आली. या तीन महिन्यांचे कालावधीत तब्बल 51 हजार प्रवाशांनी ई-रिक्षामधून प्रवास केला असून शालेय विद्यार्थ्यांसाठी एकवेळचे पाच रुपये आणि शाळेत जावून परत येण्यासाठी दहा रुपये असे भाडे आकारले जायचे. त्यात ज्येेष्ठ नागरिक आणि अपंग यांना देखील प्राधान्य देण्यात आले होते.त्यामुळे माथेरानकरांचे प्रेम या ई-रिक्षा यांना मिळाले होते.या सर्व कालावधीत सर्व ई-रिक्षा मधून नियमानुसार वाहतूक केली गेली, त्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराने शासनाने ठरवून दिलेल्या अटीनुसार वाहतूक करून सर्वांची वाहवा मिळविली.
4 मार्चपासून ई-रिक्षा बंद झाली आणि त्यानंतर शालेय विद्यार्थी यांची पुन्हा दमछाक सुरू झाल्याने विद्यार्थी शालेय येता जाता नगरपरिषद कार्यालयात जावून तेथील आवारात उभ्या करून ठेवण्यात आलेल्या सात ई-रिक्षा यांना पाहून डोळ्यातून पाणी बाहेर काढून पुढे जात असतानाचे चित्र ई-रिक्षा बंद झाल्यापासून सतत दिसत आहे. पायलट प्रकल्प संपल्याने माथेरान नगरपरिषदेच्या मालकीच्या ई-रिक्षा आपल्या कार्यालयात उभ्या कडून ठेवण्यात आल्या आहेत. त्या रिक्षा ज्या सनियंत्रण समितीच्या मंजुरीनंतर सुरू झाल्या होत्या.त्या समितीकडे पायलट प्रक्लपाचा अहवाल शासन स्तरावर सादर झाला आहे. आता त्याच सनियंत्रण समितीची बैठक 20मार्च रोजी होणार आहे.