चार्‍याच्या शोधात मेंढपाळांची भटकंती

मुरुड तालुक्यात गावोगावी मुक्काम
। आगरदांडा । वार्ताहर ।
दिड वर्षानी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर साताराहून डोक्यावर भगवा फेटा किंवा पांढरी टोपी खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन जिवाभावाच्या मेंढ्यांची राखण करणारा मेंढपाळ तालुक्यात अनेक ठिकाणी दिसू लागला आहे. उन्हाचे चटके सहन करीत रानावनात आपल्या मुलाबाळांचे धनगर कुटुंब प्रमुख मेंढ्या चराई करण्यासाठी सध्या मुरुड-तेलवडे तालुक्यातील शेतामध्ये दिसून येत आहेत.
शेतकर्‍यांनी शेतातील पिके काढल्यानंतर त्या जमिनीत मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी आणत असतात. पिके निघाल्यानंतर काही दिवसांनी शेतकरी आपली जमीन नांगरतात. त्या ठिकाणी जनावरांना खाण्यासाठी कोणताही चारा राहत नाही. त्यामुळे मेंढपाळांना स्थलांतर केल्याशिवाय पर्याय राहत नाही. आठ दिवस, पंधरा दिवस तर कधी महिन्यानंतर त्यांना आपला गाव बदलावा लागाते.

Exit mobile version