टीम इंडिया नव्हे जर्सीवर भारत हवे – सेहवाग

| दिल्ली | वृत्तसंस्था |

देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला.  त्यावरुन प्रतिक्रियांची एकच रांग लागली. सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय कलाकारांच्या प्रतिक्रियेत आता क्रीडा क्षेत्राचीही भर पडली आहे. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यानेही भारत आणि इंडिया या वादात उडी घेतली आहे. टीम इंडिया नव्हे जर्सीवर भारत असे नाव असायला हवे, असे ट्वीट विरेंद्र सेहवाग याने केलेय. सेहवागच्या ट्वीटची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सेहवाग याने या ट्वीटमध्ये जय शाह यांनाही टॅग केलेय.

टीम इंडिया नव्हे टीम भारत
विश्वचषकात आपण विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजासाठी चीअर्स करणार आहोत. भारतीय संघाच्या जर्सीवर टीम इंडिया नव्हे तर भारत लिहिलेले असायला हवे. कारण, आपल्या हृदयात भारत आहे. खेळाडूंच्या जर्सीवर भारत लिहिलेले असायला हवे, असे ट्वीट विरेंद्र सेहवाग याने केलेय.

Exit mobile version