कमी रिस्कसह जास्त नफा हवाय? जाणून घ्या एलआयसी पॉलिसीचे हे फायदे!

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नवीन पॉलिसी आणली आहे. LIC च्या अनेक स्कीम यावेळी बाजारात आहेत. त्यामुळेच प्रत्येक पॉलिसींची अचूक माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून स्वतःसाठी योग्य पॉलिसी निवडणे सोपे जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पॉलिसीबद्दल सांगणार आहोत जी तुमच्यासाठी फायदेशीर डील ठरू शकते.

धन रेखा विमा पॉलिसी काय आहे?
LIC ने 2021 मध्ये धन रेखा विमा पॉलिसी नावाची नवीन बचत विमा पॉलिसी लाँच केली होती. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक बचत जीवन विमा योजना आहे. ज्याची सध्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला चांगल्या गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळतो. यासोबतच सिंगल आणि लिमिटेड प्रीमियम असे दोन प्रकारचे प्रीमियम भरण्याचा पर्यायही यात देण्यात आला आहे. दुसरीकडे, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, धन रेखा योजना त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते.

पॉलिसीचे फायदे
धन रेखा पॉलिसी अंतर्गत, 40 वर्षांच्या टर्म प्लॅनसाठी किमान वय 90 दिवस आणि कमाल वय 55 वर्ष आहे. 30 वर्षांच्या टर्म प्लॅनसाठी किमान वय 2 वर्ष आणि कमाल वय 45 वर्ष आहे. त्याच वेळी, 20 वर्षांच्या टर्म प्लॅनसाठी किमान वय 3 वर्ष आहे आणि कमाल वय 35 वर्ष आहे. या अंतर्गत कोणत्याही भारतीय नागरिकाला पॉलिसी मिळू शकते. जर एखाद्याचा मुदतीच्या आत मृत्यू झाला, तर बोनससह विमा रकमेच्या 125 टक्के रक्कम नॉमिनीला दिली जाते. त्याच वेळी, मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर, विमाधारकांना 100% पैसे परत दिले जातात.

टीप – एलआयसीची ही पॉलिसी योजना LIC शी संबंधित असून या योजने संदर्भात बातमीत माहिती दिली आहे. धन रेखा विमा पॉलिसी गुंतवणुकीसाठी नजीकच्या एलआयसी ऑफिसला संपर्क साधावा. धन्यवाद.

Exit mobile version