आधार कार्डावरचा फोटो बदलायचा आहे? जाणून घ्या सोपी पद्धत

आधार कार्ड प्रत्येक भारतीयासाठी आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे जारी करण्यात आले आहे. आधार कार्डमध्ये कार्डधारकाचे नाव, फोटो, पत्ता आदी माहिती तसेच १२ अंकी ओळख क्रमांक असतो. हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँकांपासून ते अनेक महत्त्वाच्या कामांपर्यंत आधार कार्ड आवश्यक असतं. ती तुमची अधिकृत ओळख म्हणून काम करते. अलीकडच्या काळात आधार कार्डाने ओळखपत्राची जागा मोठ्या प्रमाणात घेतली आहे.
आधार कार्ड यूआयडीएआय बनवते आणि यामुळे त्यात बदल करणे देखील सुलभ होते. आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर ते यूआयडीएआयच्या माध्यमातूनच करता येते. पत्ता, फोटो, मोबाईल नंबर, ईमेलआयडी अशी अनेक माहिती नाव दुरुस्तीसह अपडेट करता येते. अशात आज आम्ही तुम्हाला आधार कार्डमधील फोटो अपडेट करण्यासाठी माहिती देणार आहोत, कारण आधार कार्डमध्ये आपला सध्याचा फोटो चांगला दिसत नाही अशी अनेकांची तक्रार असते. तुमच्याबाबतीतही असंच असेल तर तुम्हीही फोटो अपडेट करु शकता.

आधार कार्डचा फोटो अपडेट करण्याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे-

१) UIDAI संकेतस्थळाला भेट द्या.

२) आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करा.

३) फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरा.

४) फॉर्म घेऊन आधार नोंदणी केंद्रावर जाऊन सबमिट करा.

५) तुमचा नवीन फोटो इथे काढला जाईल.

६) तुम्हाला 100 रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल.

७) यानंतर तुम्हाला एक पोचपावती स्लिप दिली जाईल.

८) यात अपडेट रिक्वेस्ट नंबर (यूआरएन) असेल.

९) याद्वारे तुम्ही आधार कार्ड अपडेट्स ट्रॅक करू शकता.

१०) अपडेट होण्यासाठी जास्तीत जास्त ९० दिवस लागू शकतात.

११) त्यानंतर तुमचा फोटो अपडेट झालेला असेल.

या वरील स्टेप्स फॉलोकरून तुम्ही घरबसल्या आधारकार्डावरील फोटो बदलून घेऊ शकता.

Exit mobile version