घरबसल्या मतदानकार्ड काढायचं ? जाणून घ्या…


भारतात दरवर्षी निवडणुका सुरूच असतात. निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा देखील सहभाग वाढताना दिसत आहे. मतदारांमध्ये तरुणांची संख्या देखील अधिक आहे. अशात जर तुम्ही वयाची 18 वर्ष पूर्ण केली असतील किंवा तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर ते बनवून घ्यायला हवे. तुम्ही कार्यालयात न जाता घरबसल्या वोटर आयडी बनवू शकता. यासाठीची प्रक्रिया जाणून घेऊया. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार बजाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे निवडणूक ओळखपत्र दिले जाते. निवडणुकीबरोबरच नित्यनेमाच्या अनेक कामांसाठी हे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. आधार कार्ड प्रमाणेच मतदान ओळखपत्र हे एक आवश्यक दस्तावेज आहे. तुम्हाला जर वोटर आयडी बनवायचे असेल तर ते तुम्ही घरबसल्या देखील बनवू शकता. तुम्हाला कुठे जाण्याचीही गरज नाही. तुम्हाला वोटर आयडी बनवून मिळेपर्यंत साधारण महिनाभराचा कालावधी जाऊ शकतो. जाणून घ्या याकरता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, आणि कोणत्या वेबसाइटवरून हे काम पूर्ण करता येईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी काय कराल?


1) भारतीय निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे
2) त्याठिकाणी मतदाता सेवा पोर्टलवर https://www.nvsp.in/ क्लिक करा
3) त्याठिकाणी नवीन नोंदणीच्या ऑनलाइन अर्जावर क्लिक करा
4) मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडीने रजिस्ट्रेशन करून फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करा
5) त्यानंतर फॉर्म 6 सिलेक्ट करून तो काळजीपूर्वक भरा
6) याठिकाणी तुम्हाला नाव, जन्मतारीख, पत्ता ही माहिती द्यावी लागेल
7) त्यानंतर तुम्हाला पत्ता आणि जन्म दाखला ही आवश्यक कादजपत्रे स्कॅन करून जोडावी लागतील
8) सर्व कागदपत्र जोडून झाल्यावर सबमिटवर क्लिक करा

मतदान कार्डाच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे?
1) एक पासपोर्ट साइझ फोटो
2) ओळखपत्रासाठी तुम्ही जन्म दाखला, पासपोर्ट, ड्राइव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा हायस्कुल मार्कशीट अपलोड करू शकता.
3) पत्त्याच्या दाखल्यासाठी रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्राइव्हिंग लायसन्स, फोन किंवा वीज-पाणी बिल देऊ शकता.

राहत्या ठिकाणाच्या पुराव्यासाठीची कागदपत्रे
जन्माच्या पुराव्यासाठी अर्जदार ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणाचा पुरावा असणेही गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने विविध कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार यासाठी बँक, किसान, डाक कार्यालयाचे पासबुक हे पुराव म्हणून ग्राह्य धरता येते. तर इन्कम टॅक्स विभागाचे आदेश, पासपोर्ट, वाहन परवाना, किंवा रेशन कार्ड हेही वापरता येऊ शकते. याशिवाय अर्जदाराच्या नावावर किंवा त्याच्या पालकांच्या नावावर फोन, पाणी, वीज, गॅस जोडणीचे बिलही राहत्या पुराव्यासाठी ग्राह्य धरली जातात. मुख्य म्हणजे, जे व्यक्ती बेघर असतात, त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर मतदान केंद्रीय कार्यालयातील रात्री भेटी देऊन ते व्यक्ती त्याठिकाणी राहतात की नाही, याची नोंद केली जाते.

महिनाभरात मतदानकार्ड घरपोच
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या मेल आयडीवर विभागाकडून एक लिंक पाठवली जाईल. ज्या माध्यमातून तुम्ही वोटर आयडीचे स्टेटस चेक करू शकता. साधारण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुमचे मतदान ओळखपत्र तुमच्या घरी पोहोचेल.

हेल्पलाइन क्रमांक – 1950
कोणत्याही व्यक्तीला अर्ज करताना किंवा इतर कागदपत्रासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रश्‍न उद्भवल्यास 1950 या हेल्पलाइन क्रमांकाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अर्जदार वूवशेाीवसारळश्र.लेा या ईमेल आयडीवरही अधिक संपर्क करू शकतात.

नोंदणी केलीय, पण कार्ड मिळाले नही तर…..
आधार नोंदणी करूनही कार्ड हातात मिळालेले नाही, अशी अनेकांची तक्रार आहे. ते कार्ड मिळेल तेव्हा मिळेल, पण कार्ड नसले, तरी तुम्ही आधारची मतदार कार्डाशी जोडणी करू शकता. त्यासाठी आधार नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या पावतीवरील मईआयडीफ क्रमांक, तसेच नोंदणीची पावतीवर दिलेली तारीख, वेळ ही माहिती भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे आधार कार्ड हातात मिळाले नसेल, तरीही मतदार कार्डाशी त्याची जोडणी पूर्ण करता येते.

Exit mobile version