व्हॉट्सअॅप हे जगातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. केवळ संदेश पाठवणे, चॅट करणे आणि महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी याचा वापर केला जात नाही तर याचा वापर व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. परंतु, व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलच्यावेळी जास्तीत जास्त डेटा संपतो. त्यामुळे, कमीत कमी डेटा संपावा यासाठी तुम्हाला फक्त एक क्लीक करायचे आहे.
व्हॉट्सअॅप कॉलदरम्यान डेटाचा वापर कसा कमी करायचा?
1. सर्व प्रथम तुमचे व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन ओपन करा.
2. त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सच्या आयकॉनवर क्लिक करा.
3. त्यानंतर मेनूमधून ‘सेटिंग्ज’ पर्याय निवडा.
4. आता ‘storage & data’ या पर्यायावर क्लिक करा.
5. तेथे तुम्ही ‘use less data for calls’ या पर्यायावर क्लिक करा.