पायवारीसाठी वारकरी ठाम


अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती
पंढरपूर | प्रतिनिधी |
यंदाच्या आषाढी वारीसाठी सोमवारी पुणे येथे झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने आता हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळात घेतला जाणार आहे. एका बाजूला कोरोनाचे राज्यावरील संकट कायम आहे, रोज नवनवीन स्ट्रेन सापडत आहेत, यातच तिसर्‍या लाटेचे संकेत जागतिक आरोग्य यंत्रणा देत असताना यंदा आषाढी पायी वारी करू नये, अशी प्रशासनाची ठाम भूमिका आहे.

मात्र, सोमवारी पुणे येथे सर्व पालखी सोहळे, वारकरी प्रतिनिधी आणि प्रशासन यामध्ये झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने आता हा निर्णय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटसमोर ठेवण्याची वेळ आली आहे. बुधवारी होणार्‍या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version