वरंध भोरघाट वाहतुकीसाठी सुरू

। महाड । वार्ताहर ।
गेल्या आठ महिन्यापासून महाड, भोर, पुणे, पंढरपूर इत्यादी ठिकाणी जाणार्‍या आणि कोकणात येणार्‍या लोकांची खूप गैरसोय झाली होती. आ.भरत गोगावले यांच्या प्रयत्नामुळे ताबडतोब कामाला सुरुवात करण्यात आली होती.

गेल्या पावसाळ्यात घाटातील संरक्षक भिंत कोसळल्यामुळे घाट बंद करण्यात आला होता. काम खूप मोठे असल्यामुळे वेळ तर लागणारच होता पण कायमस्वरूपीची या घाटातील अडचण गोगावले यांच्या प्रयत्नामुळे दूर झाली आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित संपर्क प्रमुख विजय सावंत, महाड पंचायत समिती सभापती सपना मालुसरे, बांधकाम विभागाचे पराते साहेब, तालुका प्रमुख सुरेश महाडिक जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, महाड शहर प्रमुख नितीनजी पावले तसेच काका वैष्णव, विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत, कोंडाळकर तसेच संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते. यावेळी आ.भरत गोगावले यांनी कोकणातून जाणार्‍या परिवहन महामंडळाची बस माखजन ते पिंपरी चिंचवड या गाडी समोर श्रीफळ फोडून वाहतूक खुली केली.

Exit mobile version