। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे वसाहतीमधील गणपती मंदिर परिसरातील नागरी समस्याबाबत सिडको विरोधात एक दिवस लक्षणीय उपोषण आणि आंदोलनाचा इशारा शिवसेनेने संबंधित अधिकार्यांना दिला आहे. कामोठे विभागातील सेक्टर-18 गणपती मंदिर जवळ गणेश सोसायटी जवळील चेंबर तीन महिने आधी आतून निकामी झाले होते. याबाबत प्रशासनाला तक्रार दिली होती. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्ता पूर्ण पणे खचला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच इतर समस्या उद्भवत आहेत तरी संबंधित अधिकार्यांनी लक्ष घालावे अशी मागणी राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मनोहर त्रिमुखे, बबन गोगावले, संजय जंगम, बबन खणसे, वासुदेव शेडगे आदींनी अधिकार्यांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.