कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा


रत्नागिरीसाठी दोन दिवस महत्वाचे, हा पाऊस ढगफुटीप्रमाणे
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर तडाखा देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर कोकणात ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवल्याप्रमाणे आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस महत्वाचे आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस ढगफुटीप्रमाणे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी खबरदारीचा आदेश दिला आहे.

हवामानात होणारे बदल पावसाची पुढची स्थिती अधिक स्पष्ट होईल. सध्याच्या अंदाजनुसार रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो. यामुळे 11 आणि 12 जून या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यु लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली.

मान्सून चांगला सक्रीय झाला आहे. 12 जून नंतरदेखील पावसाचा धोका कायम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगरपालिका आणि 31 गावांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या तीन शहरात नदीच्या पुराचे पाणी घुसते. त्यामुळे धोका कायम आहे. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचं जिल्हाधिकार्‍यांनी सांगितलं
Exit mobile version