सावधान! येत्या 24 तासात राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाचा इशारा

| मुंबई | वृत्तसंस्था |

येत्या 24 तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्याता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातला आहे. अनेक ठिकाणी या पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे. कारण पावसाबरोबच अनेक ठिकाणी वादळी वारा देखील झाला. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत.

येत्या 24 तासात 'या' भागात अवकाळी पावसाचा इशारा
आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या अनेक काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांसह तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्याता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. फळबागांसह भाजीपाला पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अवकाळी पावसामुळे नांदेड, बारामती आणि नाशिकच्या सुरगाण्यात पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तिथे अवकाळीमुळे ज्वारी, केळी, आंब्याचे  मोठ्या नुकसान झाले  आहे.
आणखी किती दिवस अवकाळी पावसाचा जोर राहणार?
 राज्यात आणखी किती दिवस या अवकाळी पावसाचा जोर राहणार? याबाबतचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर याबाबात हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितनुसार येत्या (दि.19) मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम आहे. ही स्थिती (दि.19) मे पर्यंत कायम राहील. (दि.19) मे पासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने  करण्यात आले आहे.
Exit mobile version