नानांचा मृत्यू अनैसर्गिक?

। गोवा । प्रतिनिधी ।

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. नानांचे गुरुवारी (दि.8) सकाळी गोव्यातील घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

नाना पाटेकर यांना डोना पाउला येथील ओशन पार्क या त्यांच्या घरातून बांबोळी येथील मणिपाल रुग्णालयातील आपत्कालीन विभागात नेण्यात आले होते, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. कारण नानांचा मृत्यू घरात एकटे असताना झाला आणि त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने दिलेल्या रिपोर्ट्सनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

नाना पाटेकरांना पहाटे 4:20ते 4:30 च्या सुमारास रुग्णालयात आणलं होतं. आम्ही प्रयत्न केले, पण त्यांना मृतावस्थेतच आणण्यात आले होते. हे वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण असल्याने आम्हाला त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागली, असं मणिपाल रुग्णालयातील डॉ. शेखर साळकर यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. दरम्यान, गुरुवारी रात्री पुण्यातील डोणजे येथील नानाची वाडी या फार्महाऊसवर नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version