नांदगावमध्ये कचरा व्यवस्थापन जनजागृती

| कोर्लई । वार्ताहर ।

स्वच्छ गांव सुंदर गाव, एक पाऊल स्वच्छतेकडे गावाच्या उज्वल भवितव्यासाठी आरोग्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील चव्हाण यांनी उपक्रम हाती घेतला आहे. कचर्‍याची विल्हेवाट कशी लावावी याबाबत मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे (दि.18) रोजी सायंकाळी 5.30 वा. खारीक वाडा, कोळीवाडा, मोहल्ला माळीवाडा, गणपती मंदिर रीशर, कुंभारवाडा आणि दिनांक 19 नोव्हेंबर रोजी भवानी पाखाडी नागेश्‍वर नगर, दांडा महिला ग्रामस्थ सायंकाळी ठिक 5.30 वा. आयोजित केला आहे. एक पाउल स्वच्छ नांदगाव करण्यासाठी आणि गावच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करू या आणि कार्यक्रमात सहभागी होऊ या असे स्वप्नील चव्हाण यांनी केले आहे.

Exit mobile version